ज्यादा परताव्याचे अमिष; महिलेची 6 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ऑनलाइन टास्क आणि डिमॅट खात्याद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची 6 लाख 40 हजार सतरा रुपयांची फसवणूक करण्यात आली ही घटना 30 जुलै ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत भोसरी येथील इंद्रायणी नगर मध्ये घडली.

याप्रकरणी किवळे येथील केव्हीले सोसायटीतील महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. संबंधित मोबाईल धारक आणि बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी महिलेला ऑनलाइन टास्क आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले .त्यासाठी बनावट डिमॅट खाते तयार करून देत विविध बँक खात्यांमध्ये 6 लाख 40 हजार सतरा रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आली. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लबडे , पोलीस निरीक्षक घार्गे तपास करत आहेत.
अज्ञात चोरट्याने नऊ हजार चांदीचे दागिने चोरले!
पिंपरी : राहत्या घरात कोणी नसताना घराचा दरवाजा उघडा असताना घरामध्ये प्रवेश करून कपाटातील नऊ हजार दोनशे रुपये व चांदीचे दागिने अज्ञात चोराने चोरून नेले. ही घटना 16 ते 21 ऑगस्ट या दरम्यान सह्याद्री सोसायटी दोन/ ए कस्तुरी मार्केट समोर, चिखली रोड, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी एका ज्येष्ठ महिला (वय 77, सह्याद्री सोसायटी दोन/ ए कस्तुरी मार्केट समोर, चिखली रोड चिंचवड) यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे घरामध्ये दरवाजा उघडा असताना घरामध्ये प्रवेश करून कपाटातील नऊ हजार दोनशे रुपये रोख चांदीचे दागिने चोरून नेले. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व शिंदे हे तपास करत आहेत.

