लोकमान्य टिळकांचे पणतू डॉक्टर दीपक टिळक यांचे निधन!

पुणे : लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले , ते 74 वर्षांचे होते . दीपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते .त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते .आज बुधवार 16 जुलै रोजी पहाटे त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला . डॉक्टर टिळक यांच्या पाश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक कन्या नातवंडे असा परिवार आहे .
आज बुधवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळक वाड्यात ठेवण्यात आले होते . दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले . डॉक्टर दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होत . केसरीचे विश्वस्त, संपादक पद देखील त्यांनी भूषवले आहे . डॉक्टर टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते .2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जपानी भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते .

डॉक्टर टिळक यांनी शिक्षण ,पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले .टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे जपला ,केसरीसारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डॉक्टर दीपक टिळक यांना शोक संदेशाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली .

