फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर!

मतदान 2 डिसेंबर, मतमोजणी 3 डिसेंबर,निकाल जाहीर करण्याचा दिवस दहा डिसेंबर रोजी
मुंबई : महाराष्ट्रातील मतदारांना गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणूक कार्यक्रमांची प्रतिक्षा लागून राहिली होती .अखेर आज चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार असून दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांसाठी कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.

viara vcc
viara vcc

 राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवारी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल .10 डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील .या कार्यक्रमानुसार आयोगाने कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार याची सविस्तर जिल्हा यादी जाहीर केली आहे .

  असा असेल निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025
 अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025
अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर 2025
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025
आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025
 निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर 2025
 मतदान 2 डिसेंबर 2025
 मतमोजणी 3 डिसेंबर 2025,
 निकाल जाहीर करण्याचा दिवस दहा डिसेंबर 2025

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामध्ये 6849 सदस्यांची व 288 अध्यक्षांची निवड होणार आहे .यंदा दहा नव्या नगरपरिषदांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत .तर 236 नगर परिषदांची मुदत संपली आहे. राज्यातील 47 पैकी पाच नगरपंचायतीची मुदत अद्यापही संपलेली नाही .तर उर्वरित 42 नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे .यापैकी 27 नगरपंचायतीची मुदत संपली असून 15 नव्या नगरपंचायतीची यंदा यामध्ये भर पडली आहे

एकूण जागा आणि आरक्षित जागा
निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा 246
 निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती 42
एकूण प्रभाग 3820
एकूण जागा 6859
 महिलांसाठी जागा 3492
 अनुसूचित जातीसाठी जागा 895
 अनुसूचित जमातीसाठी जागा 358
नागरिकांचा मागासवर्ग प्र वर्गासाठी जागा ८२१

मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे .सर्व सुविधांमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. निवडणुकीसाठी अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाख व सदस्य पदासाठी पाच लाखांची खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे .ब वर्ग नगर परिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे 11 लाख 25 हजार आणि तीन लाख 50 हजार ठरवण्यात आली आहे .क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे सात लाख 50 हजार व दोन लाख 50 हजार ठरवण्यात आली आहे .नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी सहा लाख तर सदस्य पदासाठी दोन लाख 25 हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"