फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची यादी!

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची यादी!


नागपूर : ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झला आहे. ३९ पैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला २३५ जागांचं घवघवीत बहुमत मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र ४९ जागांपर्यंतच मर्यादित राहिली. पण २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी १२ दिवसांनंतर म्हणजेच ५ डिसेंबरला झाला. यानंतर आज (दि. १५ डिसेंबर) मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होत आहे. नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. एकूण ३९ मंत्री आज शपथ घेतली.

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार? यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं. गृहमंत्रीपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी
क्रमांक पक्ष मंत्र्यांचं नाव जबाबदारी/खातं
भाजपा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी अजित पवार उपमुख्यमंत्री
१ भाजपा चंद्रकांत पाटील
२ भाजपा मंगलप्रभात लोढा
३ भाजपा राधाकृष्ण विखे पाटील
४ भाजपा पंकजा मुंडे
५ भाजपा गिरीश महाजन
६ भाजपा गणेश नाईक
७ भाजपा चंद्रशेखर बावनकुळे
८ भाजपा आशिष शेलार
९ भाजपा अतुल सावे
१० भाजपा संजय सावकारे
११ भाजपा अशोक उईके
१२ भाजपा आकाश फुंडकर
१३ भाजपा माधुरी मिसाळ
१४ भाजपा जयकुमार गोरे
१५ भाजपा मेघना बोर्डीकर
१६ भाजपा पंकज भोयर
१७ भाजपा शिवेंद्रराजे भोसले
१८ भाजपा नितेश राणे
१९ भाजपा जयकुमार रावल
२० शिवसेना दादा भूसे
२१ शिवसेना गुलाबराव पाटील
२२ शिवसेना संजय राठोड
२३ शिवसेना उदय सांमत
२४ शिवसेना शंभूराज देसाई
२५ शिवसेना प्रताप सरनाईक
२६ शिवसेना योगेश कदम
२७ शिवसेना आशिष जैस्वाल
२८ शिवसेना भरत गोगावले
२९ शिवसेना प्रकाश आबिटकर
३० शिवसेना संजय शिरसाट
३१ राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ
३२ राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे
३३ राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे
३४ राष्ट्रवादी काँग्रेस दत्तमामा भरणे
३५ राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील
३६ राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी झिरवाळ
३७ राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद पाटील
३८ राष्ट्रवादी काँग्रेस इंद्रनील नाईक
३९ राष्ट्रवादी काँग्रेस माणिकराव कोकाटे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"