काय स्वस्त; काय महाग?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या २०२५ – २०२६ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा दिला आहेच. शिवाय कृषी विषयक उत्पादनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या योजना देखील सादर केल्या आहेत. एकूणच अर्थसंकल्पावर थोडक्यात दृष्टीक्षेप टाकूया.
देशभरातली डाळींच उत्पादन वाढविण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. पुढील सहा वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. कापसाच्या उत्पादनासाठी पाच वर्षांची योजना आखण्यात आली आहे. यामुळे देशातील वस्त्रोद्योगाला चालना मिळेल, असे नियोजन आहे. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना आणली आहे. यात पहिल्या वर्षी १० लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार आहेत.
काय स्वस्त होणार?
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ५६ औषधं कस्टम ड्यूटी फ्री
मोबाईल बॅटरी संदर्भात २० भांडवली वस्तूंना सूट
मोबाईल स्वस्त
टिव्हीचे पार्ट्स
चामड्यापासून बनविलेल्या वस्तू
भारतात तयार होणारे कापड
काय महागणार ?
फॅब्रिक
इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्क वाढले