न्यायालयातून बाहेर पडताना प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला!

पोलीसांनी हल्लेखोराला पकडलं कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्याच्या पोलीस कोठडीत आज आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातून बाहेर पडताना कोरटकर याच्यावर एका वकिलाने झडप घालत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयीन परिसरातू प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात नेत असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले आले. ते या ठिकाणी कोर्टामध्येच आले होते आणि त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ये पश्या… म्हणत ते कोरटकरच्या दिशेने धावले असता पोलिसांनी तात्काळ त्यांना धरुन बाजुला केले. बुधवारी सुनावणीवेळी प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. शुक्रवारीच्या सुनावणीत त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. सुनावणी संपवून त्याला कोठडीकडे नेत असताना गाडीत बसवण्याआधीच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
वकिलाने प्रशांत कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न केला. प्रशांत कोरटकरवर हल्ला झाल्यानंतर कोर्टाबाहेर एकच धावाधाव झाली. वकिलाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कोरटकरला घेरले. तर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या वकिलाला ताब्यात घेतले.

कोर्टासमोर तू तू मैं मैं
कोर्टासमोर इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्यात कोर्टासमोर तू तू मैं मैं झाली. दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरला. प्रशांत कोरकटरवर भाष्य करताना असीम सरोदे म्हणाले, ‘कोरटकर हा खोटारडा आहे. तो पुरावे नष्ट करणारा आहे. प्रशांत कोरटकरला सोडून चालणार नाही’.