जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बांधकाम व्यवसायिकाकडून रद्द!

पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ईमेलवरून जैन बोर्डिंग होस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्ट यांना बांधकाम व्यवसायिक विशाल गोखले यांनी व्यवहार रद्द झाल्याचा ईमेल केला आहे.व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंती ही त्यांनी केली आहे.

धर्मदाय आयुक्त यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे मेलमध्ये नमूद केले आहे. बांधकाम व्यवसायिक विशाल गोखले यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असे त्यांनी म्हटले आहे .धर्मदाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये बँकेमार्फत गोठवले आहेत .
याप्रकरणी खासदार आणि केंद्राचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या अनेक दिवस फैरी झडत होत्या. जैन बोर्डिंग विक्रीचा व्यवहार अधिकृतपणे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल असा इशारा जैन मुनि यांनी दिला आहे.

