फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

नो यूवर पोलिंग स्टेशनचा २३१८ नागरिकांनी घेतला लाभ

नो यूवर पोलिंग स्टेशनचा २३१८ नागरिकांनी घेतला लाभ

मतदान केंद्र माहितीसाठी सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन- आयुक्त शेखर सिंह

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापलिकेच्या वतीने “नो यूवर पोलिंग स्टेशन” ही सेवा सुरु केली असून आज पर्यंत २हजार ३१८ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. मतदान केंद्र, बदललेले मतदान केंद्र, नावातील बदल यासाठी मतदारांनी महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ किंवा ०२०-६७३३९९९९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, भारत निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन विविध उपाययोजना करण्याबाबत निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यानुषंगाने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. बुधवार दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या दिवशी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात “नो यूवर पोलिंग स्टेशन” कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन अथवा सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केल आहे

नियंत्रित अधिकारी यांचे नाव व पदनाम क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता सारथी हेल्पलाईन नंबर –

१ श्रीम. शितल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी, अ क्षेत्रीय भेळ चौक, निगडी, प्राधिकरण, पुणे ४४ ८८८८००६६६६,
०२०-६७३३९९९९

२ श्री. अमित पंडीत, क्षेत्रीय अधिकारी, ब क्षेत्रीय लिंकरोड, एल्प्रो मॉल जवळ, चिंचवड, पुणे ३३ ८८८८००६६६६,
०२०-६७३३९९९९

३ श्री. तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी,क क्षेत्रीय नेहरुनगर, भोसरी, पुणे ४११ ०२६ ८८८८००६६६६
०२०-६७३३९९९९

४ श्री. श्रीकांत कोळप, क्षेत्रीय अधिकारी, ड क्षेत्रीय औंध रावेत बी.आर.टी रोड, रहाटणी, पुणे १७ ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९

५ श्री. राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी,ई क्षेत्रीय ग्रोथ लॅब बिल्डींग, पांचर पोळ समोर, भोसरी ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९

६ श्री. सिताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी, फ क्षेत्रीय लोकमान्य टिकळ चौक, निगडी, पुणे ४४ ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९

७ श्री. किशोर ननवरे, क्षेत्रीय अधिकारी, ग क्षेत्रीय दिलिप वेंगसरकर क्रि. अकॅडमी, थेरगांव, ३३ ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९

८ श्री. उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी, ह क्षेत्रीय महिला आय. टी.आय, कासारवाडी ८८८८००६६६६020-०२०-६७३३९९९९

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"