दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना लांब ठेवा : अजित पवार

आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कार्यकर्त्यांनी कल्पना द्यावी
बारामती : पणदरे येथील नर्मदा किसन ऍग्रो उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अलीकडे कार्यक्रमात गर्दी वाढत आहे, सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो, पण फोटो नाय काढून दिला तरी नाराज होतात, आणि गडी बदलला असं म्हणतात,आणि अशातच एखादा नवीन गडी येतो फोटो काढून जातो आणि वाटच लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना द्यावी, दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा, असा सल्ला देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून दादांचा सल्ला
वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. गड्यांनो, आमच्यासोबत कोण फोटो घेतोय याची काळजी घ्या, असे आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अजित पवार बोलताना म्हणाले, आपले फोटो कार्यक्रमात कोणासोबतही काढले जातात. परंतु, काही वेळा याची किंमत मोजावी लागते. अलीकडे गर्दी वाढत आहे. सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण, फोटो नाही काढू दिला, तर नाराजी होते अन् गडी बदलला, असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि पुढे वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतोय, याची आम्हाला कल्पना द्यावी, असं म्हणत स्पष्ट शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती देण्याचं आवाहन केलंय.
दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना
अजित पवार यांनी वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केलं आहे. सध्या राजकारण काय चाललंय ते पाहा. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो. सगळं आकरीतच घडत आहे. त्यामुळे यदाकदाचित कोणा चुकीच्या माणसाचा फोटो माझ्यासोबत काढला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे, असे मी सांगेन. मी पोलिसांनाही सांगितले आहे की, कार्यक्रमात असे कोणी फोटो काढत असतील, त्यावर लक्ष द्या. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.