फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
देश विदेश

न्यायमूर्ती सूर्यकांत; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे उत्तराधिकारी!

न्यायमूर्ती सूर्यकांत; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे उत्तराधिकारी!

नवी दिल्ली : भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई हे 23 नोव्हेंबर निवृत्त होणार आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची त्यांचा उत्तराधिकारी म्हणून केंद्र सरकारला शिफारस केली आहे. सर न्यायाधीश गवई यांनी संबंधित पत्राची प्रत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनाही दिली .

viara vcc
viara vcc

23 ऑक्टोबर रोजी सरकारने सरन्यायाधीश गवई यांना पत्र लिहून शिफारस पत्र पाठवण्याची विनंती केली होती. निवृत्त होणारे सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्यासाठी सरकारला पत्र लिहितात ही आत्तापर्यंतची परंपरा आहे .न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1981 साली त्यांनी हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. 1984 मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली, आणि हिसार येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.

त्यानंतर 1985 मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी चंदीगडला गेले .तिथे त्यांनी संवैधानिक सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले .नऊ जानेवारी 2004 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती झाली. पुढे 5 ऑक्टोबर 2018 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले .24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली .12 नोव्हेंबर 2024 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत .कलम 370 रद्द करणे ,अभिव्यक्ती स्वातंत्र्य ,लोकशाही ,भ्रष्टाचार, पर्यावरण आणि लिंग समानता यासारख्या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी दिलेल्या निकालांचे स्वागत देशभर झाले आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"