सराफ दुकानदाराला तीन लाख रुपयांना गंडविले!

पिंपरी : सराफ दुकानात तीन लाख सात हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट व अंगठी खरेदी करून आयडीएफसी बँक खात्याचा धनादेश देऊन फसवणूक केली. ही घटना 13 जानेवारी 2026 रोजी वर्धमान ज्वेलर्स सराफ दुकान, चर्होली फाटा येथे घडली.
या प्रकरणी निलेश हिरालाल चोपडा (वय 50, फ्लॅट नंबर 402, सौंदर्य एडिफाइस, उद्योग नगर चिंचवड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतीश ज्ञानदेव वालसिंग (वय 45 अंदाजे पूर्ण नाव पत्ता माहित नाही )असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या सराफ दुकानातून आरोपी याने तीन लाख सात हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट व सोन्याची अंगठी असे दागिने खरेदी केले. त्याचे पैसे चेकने देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. बंद पडलेल्या आयडीएफसी बँक खात्याचा चेक फिर्यादी यांना देऊन व त्यांचे बँक खात्यावर पैसे असल्याचे सांगून फसवणूक केली. पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गपाट पुढील तपास करत आहेत.

पिंपरीत अमली पदार्थ जप्त!
पिंपरी: पिंपरीतील साई चौक परिसरात एका व्यक्तीच्या अंगझेडतीमध्ये 16 हजार रुपयांच्या किमतीचे 3.22 ग्रॅम हीरॉईन आढळून आले याप्रकरणी वशेष बन्या तामचीकर (वय 35, रा. भाटनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिस अंमलदार दिनेश तुकाराम पुंडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गस्तीदरम्यान आरोपीकडे संशयास्पद हालचाली आढळल्याने तपासणी केली असता सोळा हजार रुपयांच्या किमतीचे 3.22 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले.

