फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पुणे

मराठ्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य : पांडुरंग बलकवडे

मराठ्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य : पांडुरंग बलकवडे

पुण्यात २६६ वा ‘पानिपत शौर्यदिन’ भव्यदिव्य स्वरूपात साजरा
पुणे : श्रीमंत महाराज महादजी शिंदे हे मराठा सेनेतील अत्यंत महान, पराक्रमी योद्धे असण्यासोबतच दूरदृष्टी असलेले कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी होते. अत्यंत कठीण काळात त्यांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली आणि आपल्या अद्वितीय युद्धनीती व कूटनीतीच्या जोरावर मराठा सत्ता पुन्हा सशक्त केली. पानिपतच्या युद्धात त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते. राजकारण, प्रशासन आणि मुत्सद्देगिरीत त्यांनी असाधारण क्षमता दाखवली. त्यांचे जीवन धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणादायी गाथा आहे. मराठ्यांचा इतिहास गौरवशाली असून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी केले.

viara vcc
viara vcc

मराठा साम्राज्याचे महान सेनानी श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करण्यासाठी २६६ वा पानिपत शौर्यदिन २०२६ हा सोहळा पुण्यातील वानवडी परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भव्य वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव मांडवे यांनी केले होते.

या प्रसंगी आर. डी. पाटील, यशवंत भोसले, कुमार देशमुख, उमेश शिंदे, विलास शिंदे, शेखर ह्युलाकार, उत्तमराव मांडवे, निलेश शहाणे, ज्ञानेश्वर सपकाळ, रंजनाताई भोकरे, संजय मोहिते, विकास शिंदे, नितीन गुंजाळ, हिरामण सपकाळ, संजय देवकुळे, बाळासाहेब पाटील, विजय वंजारी, शशिकांत शिंदे, अजित गायकवाड, प्रदीप देशमुख, अभयसिंह दांडेपाटील, प्रवीण दाभाडे, दिलीप सावंत, शरद मडके, कृष्णन गणेश आदींसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, इतिहासप्रेमी नागरिक, माजी सैनिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानिमित्ताने वानवडी येथील ऐतिहासिक शिंदे छत्री येथे मराठा वीरांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पानिपतच्या पवित्र भूमीतून आणलेल्या मातीच्या मंगलकलशाचे पूजन करण्यात आले. पानिपतच्या युद्धात बलिदान दिलेल्या शूर मराठा योद्ध्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना उत्तमराव पांडुरंगराव शिंदे सरकार म्हणाले की, मराठा साम्राज्याचा गौरव वाढवणारे महान योद्धे श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ जानेवारी रोजी पानिपत शौर्यदिन साजरा केला जातो. हा उपक्रम सलग आठव्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"