राज्यात मोठे मताधिक्य घेणारे नेते कोण?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, कोणता उमेदवार विजयी झाला, कोण हरला तर कोणाचे डिपॉझिटच जप्त झाले, हे जसे चर्चेचे विषय ठरतात, त्याचप्रमाणे कोण उमेदवार किती मताधिक्याने निवडून आला, हा त्याही पेक्षा अधिक औत्सुक्याचा विजय असतो.विजयी होतानाच मतांची आघाडी घेऊन त्या मतदार संघावर असलेले आपले वर्चस्व सिद्ध करण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. असे एक लाखाहून अधिक मताधिक्य घेणाऱ्या पहिल्या दहा आमदारांविषयी जाणून घेऊया.
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर २८८ पैकी २३६ मतदारसंघात विजय मिळवत महायुतीने यश मिळविले. महायुतीचे अनेक उमेदवार हे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्याचबरोबरीने भाजपाच्या १३२ उमेदवारांनी बाजी मारली आहे आणि तितक्या जागांवर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत.
मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांचे नावे पुढीलप्रमाणे :
१. सातारा मतदारसंघ- शिवेंद्रराजे भोसले (भाजप) – १ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने विजयी
२. परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – १ लाख ४० हजार २२४ मतांनी विजयी
३. बागलाण- दिलीप बोरसे (भाजप) – १ लाथ २९ हजार २९७ मतांनी विजयी
४. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना) – १ लाख २० हजार ७१७ मतांनी विजयी
५. कोथरुड – चंद्रकांत पाटील (भाजप)- १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजयी
६. मावळ मतदारसंघ – सुनील शेळके (राष्ट्रवादी) – १ लाख ८ हजार ५६५ मतांची विजयी
७. ओवळा माजीवड -प्रताप सरनाईक (शिवसेना) – १ लाख ८ हजार १५८ मतांनी विजयी
८. दादा भुसे, मालेगाव बाह्य (शिवसेना) – १ लाख ६ हजार ६०६ मतांनी विजयी
९. चिंचवड मतदारसंघ – शंकर जगताप (भाजप) – ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी
१०. बारामती मतदारसंघ – अजित पवार (राष्ट्रवादी) – १ लाख ८९९ मतांनी विजयी