फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन!

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन!

वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास
मुंबई :आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरात सुतार यांनी 200 हून अधिक शिल्प बनवले आहेत. राम सुतार यांना पद्मश्री ,पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता

viara vcc
viara vcc

तीन दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ,तो पुतळा देखील राम सुतार यांनी साकारला होता. पिंपरी चिंचवड मोशी येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा देखील सुतार यांनीच साकारला आहे. जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारल्यामुळे राम सुतार यांना जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने 1999 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .1954 ते 1958 या काळात त्यांनी अजिंठा आणि वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक कोरीव काम देखील केले आहे.

राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. प्रारंभी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण पूर्ण केले. सुतार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पुतळे साकारले आहेत. भारतीय कला आणि संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते. संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या मूर्तीचा विशेष उल्लेख केला जातो. या मूर्तीच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यासारख्या देशांमध्येही पाठवण्यात आल्या आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"