फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश!

हिंजवडीतील पावसाच्या पाण्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश!

पिंपरी : हिंजवडी फेज १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ते दुरुस्ती आणि नागरी सुविधांबाबत सोमवारी (दि.१६) पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अध‍िकारी व‍िजय राठोड यांनी अध‍िकारी यांच्यासह पाहणी केली. त्यानंतर हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन येथे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

सात जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क मधील फेज एक फेज दोन आणि फेस तीन तसेच मेट्रो मार्गासह रस्त्यावर साचलेल्या तुडुंब पाण्यामुळे नागरिकांना सोसावा लागलेल्या त्रासामुळे संतापाचे वातावरण हिंजवडीसह आयटी पार्क मधील कर्मचारी , नागरिकांमध्ये होते .उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे आणि मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी या तुंबलेल्या पाण्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणावर नाराजी व्यक्त केली होती , याची दखल घेऊन आज एमआयडीसी, पीएमपीएमआरडीए ,पोलीस अधिकारी ,मेट्रो अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून पाण्याचा निचरा कसा करता येईल याबाबत माहिती घेतली आणि तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले

viarasmall
viarasmall

तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश

  • डॉल्फिन आणि साई प्रोविजो इमारतीजवळील उपाययोजना:
    पावसाळी पाण्याचा निचरा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणार.
  • राडाराडा व्यवस्थापन:
    मेट्रो मार्गासह परिसरात पडलेला राडाराडा त्वरित हटवून योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे निर्देश.
  • प्रदूषणविरोधी कारवाई:
    नैसर्गिक नाल्यात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाईसाठी आदेश.
  • नैसर्ग‍िक नाले खुले करावेत:
    बंद केलेले नैसर्गिक नाले खुले करत मार्गातील राडारोडा दूर करावा. ड्रेनेज लाईनची स्वच्छता/दुरुस्तीचे आदेश.

यावेळी पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता न‍ितीन वानखेडे, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास व परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, ह‍िंजवडी वाहतूक व‍िभागाचे पोलीस न‍िरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्यासह व‍िव‍िध व‍िभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत ११ जून २०२५ रोजी पीएमआरडीचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"