फक्त मुद्द्याचं!

15th February 2026
गुन्हेगारी

ज्येष्ठांची फसवणूक करणारा सराईत अटकेत!

ज्येष्ठांची फसवणूक करणारा सराईत अटकेत!

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकांना पोलिस असल्याचे सांगून सोन्याचे दागिने हालचालाकीने काढून फसवणूक करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत इराणी आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील इराणी वस्ती, आंबिवली येथून अटक केली आहे. मोहम्मद सय्यद कंबर अली (वय 40, स्टार बेकरी जवळ, इराणी वस्ती, अंबिवली, ठाणे) याला 13 फेब्रुवारी रोजी सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

viara vcc
viara vcc

संबंधित संशयित व त्याचे साथीदार वयोवृद्धांना रस्त्यात अडवून आपण पोलिस असल्याचे सांगून तुमच्या दागिन्यांची तपासणी करायची आहे अशी बतावणी करीत असत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुमारे 100 ते 120 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींचा ठाव ठिकाणा मिळविला. आरोपीस अटक करताना इराणी नातेवाईकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्यांच्या विरोध डावलून धाडसाने कारवाई केली .आरोपीवर हिंजवडी व देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तपास गुन्हे शाखा युनिट दोन करीत आहे. ही कामगिरी उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे,पोलिस उपायुक्त जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"