फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाकरीता पूर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी!

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाकरीता पूर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी!

पुणे : जिल्ह्यातील युवक-युवतींना भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र होण्याच्यादृष्टीने कंम्बाईन्ड डिफेन्स सिर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे १६ जून २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे, या संधीचा लाभ घेण्याकरीता जिल्हा सैनिक कार्यालय येथे १२ जून २०२५ रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील सीडीएस-६५ अभ्यासक्रमाकरीता (संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडील मुद्रित) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टाची तीन मुद्रीत प्रती सोबत घेऊन यावे. इच्छुक उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस (या परीक्षेकरिता ऑनलाईनपद्धतीने अर्ज केलेला असावा.

Vaiga Digital Creatives
Vaiga Digital Creatives

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉटस्ॲप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्याकरीता) कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"