सिक लिव्ह घेताय? मग हे वाचाच!!

जर्मनीत सिक लिव्ह घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमागे कंपन्या नेमत आहेत गुप्तहेर
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
जर्मनी (वृत्तसंस्था) : वर्ष संपत येताना शिल्लक राहिल्या म्हणून सिक लिव्ह घेणे, कामापासून सुटका म्हणून एखादी सिक लिव्ह टाकणे, घरातलं एखादं कार्य सिक लिव्ह टाकून अटेंड करणे असे अनेक प्रकार नोकरदार आपल्या कार्यकाळात करत असतात. आजारपण नसत्ताना सिक लिव्ह टाकून घरातली किंवा वैयक्तिक जादाची कामं उरकणे ही तर अगदी सामान्य बाब आहे. पण जर्मनीमध्ये अशी सुट्टी आता कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरणार आहे.
आजारपणाच्या सुट्ट्यांमध्ये सातत्य आढळल्यास ते जाणून घेण्यासाछी जर्मनीतील कंपन्या आता गुप्तहेरांची मदत घेणार आहेत. जे कर्मचारी भविष्यात आजारपणाच्या सुट्ट्या घेऊन जास्त दिवस कार्यालयात येणार नाहीत, त्यांची गुप्तहेरामार्फत माहिती काढली जाणार आहे. जगभरातून या निर्णयावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
जर्मनीमधील कर्मचाऱ्यांचे सिक लिव्हचे प्रमाण वाढले आहे, अशी तेथील राष्ट्रीय सांख्यिकी संस्था; डेस्टॅटिसची आकडेवारी सांगते. २०२१ मध्ये सिक लिव्हचे प्रमाण प्रति कर्मचारी ११.१ (दिवस) होते. आता ते १५.१ (दिवस) एवढे झाले आहे. २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्याच्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी सरासरी १४.१३ दिवस आजारपणाची सुट्टी आहे.
करोनाच्या काळात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे धोरण शिथिल झाले होते. त्यानंतरच सिक लिव्हचे प्रमाण वाढले आहे. लोकांच्या सोयीसाठी सिक लिव्हसाठी लागणारे प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून देण्याची पद्धत होती. पण जर्मनीमध्ये त्याचा गैरवापर झाल्याचे लक्षात आले आहे. जर्मनीतील कर्मचाऱ्याला वर्षात सहा आठवड्यांची भरपगारी आजारपणाची सुट्टी मिळते. चार आठवड्यानंतर विम्याचा लाभही मिळू शकतो. मात्र, कर्मचारी सातत्याने याचा लाभ घेत असल्याने कंपनीवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या अशा सुट्टीवर जर्मनीमध्ये स्पाय ठेवण्याची वेळ आली आहे.