पंतप्रधान मोदींची फेब्रुवारीत `व्हाइट हाऊस`ला भेट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊस या निवासस्थानी बैठकीसाठी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फ्लोरिडाहून जॉइंट बेस अँड्र्यूजवर परतताना एअर फोर्स वनमध्ये बसून ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
ट्रम्प म्हणाले की, सोमवारी आमच्या दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. बहुत करून पुढच्या महिन्यात ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) व्हाइट हाऊसमध्ये येणार आहेत. भारताबरोबरचे आमचे संबंध अतिशय उत्तम आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या बरोबर झालेल्या चर्चेविषयीच्या प्रश्नांना सुद्धा ट्रम्प यांनी यावेळी उत्तरे दिली. आमच्या उभय देशांत सर्व काही ठीक आहे, असे त्यांनी दोन देशांबद्दलच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेतील आशयाबद्दल बोलताना सांगितले.
ट्रम्प आणि मोदी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघांनी सप्टेंबर २०१९ मध्ये ह्यूस्टन आणि फेब्रुवारी २०२० मध्ये अहमदाबादमध्ये दोन वेगवेगळ्या रॅलींमध्ये हजारो लोकांना संबोधित केले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक विजयानंतर त्यांच्याशी बोलणाऱ्या तीन जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा समावेश होता.
(संदर्भ – पीटीआय)