फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

शासन सेवेत प्रामाणिकपणे सेवा निभावण्याला महत्त्व : उपसंचालक डॉ. मोघे

शासन सेवेत प्रामाणिकपणे सेवा निभावण्याला महत्त्व : उपसंचालक डॉ. मोघे

माहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
पुणे : पुणे विभागीय माहिती कार्यालयातील वाहनचालक विलास मारुती कुंजीर हे ३० वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय सेवेत शासन-प्रशासनाशी प्रामाणिक राहून सेवा निभावण्याला महत्त्व असून कुंजीर यांची कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावना वाखाणण्याजोगी आहे, असे कौतुकोद्गार माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी याप्रसंगी काढले.

सत्कार समारंभाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, कुंजीर यांची पत्नी सुरेखा कुंजीर व सर्व कुटुंबीय तसेच विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

viarasmall
viarasmall

उपसंचालक डॉ. मोघे म्हणाले, शासकीय सेवा करत असताना नियुक्ती ते सेवानिवृत्ती या दोन बिंदूंमधील प्रवास सुखकर करुन इतरांना आनंद देता येणं महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेऊन काम केल्यास शासन सेवेतील कालावधी सुखकर होतो. वरिष्ठांच्या शब्दाला नेहमीच मान देतांना सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय ठेवता आल्याने श्री. कुंजीर यांचा शासकीय सेवेतील प्रवास सुखकर झाला. सेवानिवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ द्यावा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा, स्वत:च्या व कुटुंबियांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. रवींद्र ठाकूर, सचिन गाढवे, विलास कसबे तसेच सुनील झुंजार यांनी मनोगत व्यक्त केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"