गॅस सिलेंडरमधून अवैध रीफिलिंग!

पिंपरी, : घरगुती गॅस सिलींडरमधून इतर सिलींडरमध्ये अवैध रीफिलिंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याामुळे जिवीतास धोका निर्माण झाला होता. ही घटना ६ जुलै रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता महाळुंगे – नांदे रोड येथे उघडकीस आली.
संतोष मनोहर बंडगर (वय २२, रा. व्हीटीवी चौक, नांदे रोड, महाळुंगे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई अमोल गोरे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आहे. आरोपीने त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हिस सेंटरमध्ये घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलींडरमधून रीफिलिंग करणे हे धोकादायक असल्याचे माहित असतानाही जाणीवपूर्वक इतर सिलींडरमध्ये गॅस भरत होता. महिला फौजदार जाधव तपास करीत आहेत.

मटका जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी, : देहूरोड – गांधीनगर भागात मटका जुगार खेळत असलेल्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकत सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. ७) दुपारी सव्वादोनच्या सुमारास करण्यात आली.
रमजान मोहम्मद हानिफ शेख (वय ५२, रा. ओटास्किम, निगडी), शशिकांत सुभाष मोरे (वय ४३, रा. दत्तनगर, मोहननगर), अनिल छगन अक्कर (वय ७२), प्रेमदास दौलत चितारे (वय ७२), सुरज बापू साथाळे (वय ३६), लक्ष्मण राम कोवेम्मुला (वय ६५) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार पंकज भदाने (वय ३४) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मटका जुगाराचे आकडे लिहून घेऊन पैसे खेळवताना आढळून आले. ते मुंबई कल्याण मटका नावाचा मटका खेळत होते. पोलीस हवालदार खेडकर तपास करीत आहेत.