फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र

विरोधात काम केल्यास ‘लाडकी बहीण’मधून नावे वगळणार: आमदार महेश शिंदे

विरोधात काम केल्यास ‘लाडकी बहीण’मधून नावे वगळणार: आमदार महेश शिंदे

सातारा: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे या महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. मात्र ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊनही विरोधात काम करतील, निवडणुकीनंतर त्यांची नावे या योजनेतून वगळली जातील, असे वक्तव्य साताऱ्यातील कोरेगावचे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात केले.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठ्या संख्येने युवती व महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या नोंदणीच्या आधारे सरकार मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असताना आमदार शिंदे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजेनवरून बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांना थेट इशाराच दिला. निवडणुकीनंतर डिसेंबरमध्ये या योजनेसाठी तपासणी समितीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेतून तुमची नावे वगळण्यात येतील, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार शिंदे यांनी केले.

महायुतीमध्ये मित्र पक्ष असलेल्या आमदार रवी राणा यांनी देखील अशीच धमकी योजनेतील महिलांना दिली होती , त्यामुळे सत्ताधारी पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"