मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
कोलकाता : जर तुमचा सरकारवर विश्वास नसेल, तर मी माझे मुख्यमंत्रिपदही सोडायला तयार आहे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांना उद्देशून म्हटले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला माझ्या पदाची आजिबात चिंता नाही. सगळ्या आंदोलक डॉक्टरांची मला काळजी आहे. त्यांच्या वेदना मी समजू शकते. त्यांच्या सुरक्षेचीही चिंता आहे. या प्रकरणातील दोषींना सहज सोडणार नाही. मात्र, तुम्ही सगळ्यांनी आपल्या कामावर परत यावे, ही विनंती आहे, असे म्हणत आंदोलक डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात नऊ ऑगस्ट रोजी डॉक्टर तरूणीवर बलात्कार होऊन तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलने सुरू झाली, ती अजूनही चालू आहेत. या प्रकरणी सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.