हॉटेल व्यवसायीक महिलेला खंडणीसाठी धमकावले ; एकास अटक!

पिंपरी :एका व्यक्तीने मी गुन्हेगार आहे येथे हॉटेल चालवायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी व शिवीगाळ एका महिलेला करण्यात आली करण्यात आली. ही घटना शनिवार चार एप्रिल रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास खानदेशी तडका हॉटेल, यमुनानगर, निगडी येथे घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
. एका 23 वर्ष महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार विशाल प्रल्हाद देवकर (वय 32, रा. बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी देवकर यांनी हॉटेलमध्ये येऊन मी गुन्हेगार आहे असे सांगून शिवीगाळ करून येथे हॉटेल चालवायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली, व पैसे न दिल्यास मारण्याची व हॉटेल तोडण्याची धमकी दिली. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ याबाबतचा तपास करत आहेत.

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी :बांधकाम व्यवसायासाठी चार कोटी रुपयांची कर्ज मिळवून देण्याचे आमीष दाखवून एका व्यवसायिकाची पाच लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान हिंजवडी चौक येथे घडली.
याप्रकरणी अनिकेत संजीव कुमार अग्रवाल (वय 35, रा. भोसले नगर पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक कोंडीबा फडके, (रा. कानगाव, दौंड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने विश्वास संपादन करून त्यांना चार कोटीचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले .त्यासाठी बाणेर येथील एका फ्लॅटचा समझोता करारनामा करून त्याची मूळ प्रत आणि आगाऊ सुरक्षा ठेव म्हणून पाच लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र कर्ज न मिळवून देता ही रक्कम परत न करता फसवणूक केली.

