फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र

गर्भवती महिलेवर उपचार करण्यास हलगर्जीपणा ;रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश!

गर्भवती महिलेवर उपचार करण्यास हलगर्जीपणा ;रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आदेश दिले आहेत
पुणे : येथील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा सुशांत भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे या घटनेची सखोल चौकशी तज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्याकडून याची संपूर्ण माहिती आरोग्य विभागाने तातडीने घेऊन पारदर्शक आणि निपक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने जरी त्यांचे म्हणणे माध्यमांसमोर मांडले असले तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची चौकशी करून योग्य कारवाई करेल ,या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती संस्था आणि संघटनेच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळल्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पवार यांनी सांगितले. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे धर्मदाय आयुक्तांना चौकशीचे आदेश
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मुजोर प्रशासनामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने शहरात आणि राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी असे आदेश बनसोडे यांनी धर्मदाय आयुक्तांना दिले आहेत, गर्भवती महिला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेली असता त्यांच्याकडे प्रथम दहा लाख रुपये भरावेत अशी मागणी करण्यात आली .परंतु अचानक एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांनी काही वेळ मागून घेतला आणि तातडीने अडीच लाख रुपये भरण्याची तयारी देखील दाखवली .परंतु आडमुठे प्रशासन यांना घाम फुटला नाही त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून या महिलेला वाकड येथील सूर्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करणे भाग पडले या कालावधीत या महिलेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला याचा परिणाम त्या महिलेच्या मृत्यूमध्ये झालेअसे बनसोडे यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"