भरधाव ट्रकची धडक ; दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकी स्वराला पाठीमागून धडक देऊन दुचाकी मागे बसलेल्या व्यक्तीच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार 11 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास मौजे मधुबन हॉटेल समोर, देहू ते आळंदी रोडवर, जाधववाडी, चिखली येथे घडली .

सुनील पांडुरंग कांबळे (वय 29, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत ट्रक क्रमांक एम एच 14/ जे एल /82 90 वरील चालक (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचालक आरोपी याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच 14/ जे एल/ 82 90 हा भरधाव वेगाने चालवून पुढे असणाऱ्या पल्सर मोटर सायकल क्रमांक एम एच 14/ एम एक्स/ 18 42 या पल्सर मोटर सायकल दुचाकी स्वराला जोरात धडक दिली. ट्रकने धडक दिल्याने दुचाकी वरील फिर्यादीचा भाऊ अनिल पांडुरंग कांबळे (वय 25 ) खाली पडला. ट्रकचे चाक फिर्यादीच्या भावाच्या अंगावरून गेल्याने त्याच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ट्रकचालक फरार आहे .चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार पारधी हे तपास करत आहेत.

