फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

हिंजवडी बस अपघात ; बस चालकाने मद्यपान केल्याचे पोलिसांचे म्हणणे

हिंजवडी बस अपघात ; बस चालकाने मद्यपान केल्याचे पोलिसांचे म्हणणे

पिंपरी : हिंजवडीतील आयटी पार्क मधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस नियंत्रण सुटून पदपथावर चढल्याने झालेल्या अपघातात बहिण भावांचा जागीच मृत्यू झाला. बस चालकाने मध्यपान करून बस भरधाव चालवल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा अपघात सोमवार एक डिसेंबर रोजी सायंकाळी पंचरत्न चौकात झाला .त्यामध्ये अर्चना देवेंद्र प्रसाद (नऊ),सुरज देवेंद्र प्रसाद (10 दोघेही हिंजवडी )यांचा मृत्यू झाला. त्यांची मोठी बहीण प्रिया देवेंद्र प्रसाद (वय १६) अविनाश हरिदास चव्हाण (वय 26) हे गंभीर जखमी झाले .त्यांच्यावर औंध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमल राजू ओझरकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. बस चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय 36 ,भोसरी)याला पोलिसांनी अटक केली आहे . बस चालक गुजरने मद्यपान केले होते अशी माहिती पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली

बस आयटी पार्क मधून भोसरीकडे जात होती.भरदाव वेगाने बस चालविणाऱ्या गुजरचे पंचरत्न चौकात बस वरील नियंत्रण सुटले. बस थेट पदपथावर चढली. त्यावेळी प्रिया लहान भाऊ आणि बहिणीला शाळेतून घरी घेऊन जात होती. ते पदपथावरून चालले होते. त्यांना बसने अक्षरशः चिरडले .पोलिसांनी तातडीने कारवाई करत बस चालकाला ताब्यात घेऊन अटक केली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"