फक्त मुद्द्याचं!

17th April 2025
विधानसभा २०२४

राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात!

राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात!

सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात
मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाल आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे ४५ टक्केच मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
अहमदनगर – ७१.७३ टक्के,
अकोला – ६४.९८ टक्के,
अमरावती – ६५.५७ टक्के,
औरंगाबाद- ६८.८९ टक्के,
बीड – ६७.७९ टक्के,
भंडारा – ६९.४२ टक्के,
बुलढाणा – ७०.३२ टक्के,
चंद्रपूर- ७१.२७ टक्के,
धुळे – ६४.७० टक्के,
गडचिरोली – ७३.६८ टक्के,
गोंदिया – ६९.५३ टक्के,
हिंगोली – ७१.१० टक्के,
जळगाव – ६४.४२ टक्के,
जालना – ७२.३० टक्के,
कोल्हापूर – ७६.२५ टक्के,
लातूर – ६६.९२ टक्के,
मुंबई शहर- ५२.०७ टक्के,
मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,
नागपूर – ६०.४९ टक्के,
नांदेड – ६४.९२ टक्के,
नंदुरबार- ६९.१५ टक्के,
नाशिक – ६७.५७ टक्के,
उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,
पालघर – ६५.९५ टक्के,
परभणी – ७०.३८ टक्के,
पुणे – ६१.०५ टक्के,
रायगड – ६७.२३ टक्के,
रत्नागिरी – ६४.५५ टक्के,
सांगली – ७१.८९ टक्के,
सातारा – ७१.७१ टक्के,
सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,
सोलापूर – ६७.३६ टक्के,
ठाणे – ५६.०५ टक्के,
वर्धा – ६८.३० टक्के,
वाशिम – ६६.०१ टक्के,
यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"