श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिराच्या विकास आराखड्यास हेरिटेजचे स्वरुप : अजित पवार

मुंबई : राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिराच्या विकास कामांना गती देताना मंदिराच्या मूळ वास्तूला कोणताही धक्का लागू नये तसेच प्रत्येक कामाला हेरिटेज स्वरूप लाभावे यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात यावे असे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले आहेत .

श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिरांच्या परिसर विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.. या बैठकीस पुरातत्व व वास्तुसंग्रहालय विभाग पुणे चे सहाय्यक संचालक विलास वाहणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे ,अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .गजानन पाटील , रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले ,तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे हे दूरद्रश्य संवाद प्रणाली द्वारे उपस्थित होते .
अष्टविनायकापैकी मयुरेश्वर (मोरगाव) ,चिंतामणी ( थेऊर), विघ्नेश्वर (ओझर) , महागणपती (रांजणगाव), वरदविनायक ( महाड), सिद्धिविनायक (सिद्धटेक), आणि बल्लाळेश्वर ( पाली) या मंदिराच्या परिसरातील सुरू असणाऱ्या विकास कामांना वेळेत पूर्ण करावे. तसेच दर्जेदार कामगिरी करून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पवार यांनी बैठकीत केल्या .मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी .मूळ मंदिराशी विसंगत असलेली बांधकामे दूर करून मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी .आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाची वाहने मंदिर परिसरात सहस्तेने जाऊ शकतील अशा दृष्टीने मार्ग व्यवस्था सुसज्ज करण्यात यावी असेही पवार यांनी स्पष्ट केले.

