फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

हरियाणात एक्झिट पोलचे अंदाज फसले

हरियाणात एक्झिट पोलचे अंदाज फसले

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. एक्झिटपोलचे अंदाजात ट्विस्ट येत, प्राथमिक फेऱ्यांमध्ये तरी भाजपाची आघाडी दिसत आहे.

हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा बदल दिसत आहे. हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज कालपर्यंत व्यक्त केला जात होता. एग्झिट पोल्सनीही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्टपणे बहुमत पडेल, असे सांगितले होते. इतकेच नव्हे तर, काँग्रेसचे नेतेही त्यांचे सरकार आल्याप्रमाणे थेट मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा करत होते. मात्र आता मतमोजणीत प्राथमिक फेऱ्यातच फटका बसला आहे. ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली असून ४९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. बहुमताचा आकडा ४६ असल्यामुळे भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुरू केलेला जल्लोष थांबविला आहे.

एग्झिट पोल्सनी काँग्रेसला बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्या काँग्रेस केवळ ३६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नवी दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयाबाहेर सकाळपासून जल्लोष सुरू होता. मात्र भाजपाने आघाडी घेतल्यानंतर जल्लोष थांबविण्यात आला आहे. तसेच काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी माध्यमांशी बोलताना फार उत्साह दाखविला नाही. “आम्ही आशावादी आहोत. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ माहिती अपडेट करत नाही. तीच माहिती वापरून माध्यमे बातम्या देत आहेत. पण आमच्या कार्यकर्त्यांकडून जी माहिती मिळत आहे, त्यानुसार आम्ही पुढे आहोत”, असे सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

शेअर मार्केटवर परिणाम
हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे प्राथमिक ट्रेंड समोर आले आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीत पिछाडीला पडल्यानंतर आता भाजपाने सुरुवातीच्या कलात बहुमताचा आकडा पार केल्यास दिसत असून या ट्रेंडमुळे शेअर बाजाराने देखील आपला रंग बदलला आहे. मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराची अडखळत सुरुवात झाली पण हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत असताना सेन्सेक्स आणि निफ्टी हिरवेगार झाले आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"