फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

44 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त!

44 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त!

पिंपरी : अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला असे 44,219 रुपये किंमतीचे अमली पदार्थ अवैधरित्या विक्री करण्यासाठी ताब्यात ठेवल्याने आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार 18 जानेवारी रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास घर नंबर 145, टिंगरे चाळ घराचे समोर, मोकळ्या जागेत, एसटी रोड दापोडी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत प्रसाद मारुती कलाटे पोलीस हवालदार, अमली पदार्थ विरोधी पथक ,गुन्हे शाखा यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रुपेश राजेंद्र देवाडिगा (वय 31, रा. टिंगरे चाळ, एसटी रोड, दापोडी पुणे )असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारी, असे प्रतिबंधित अमली पदार्थ जवळ बाळगून आदेशाचे उल्लंघन केले. वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा सुगंधी तंबाखू व पान मसाला गुटखा असे एकूण 44 हजार 229 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. दापोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महानवर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"