फक्त मुद्द्याचं!

18th April 2025
पुणे

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन!

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन!

तुळापूर वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचेही घेतले दर्शन
पुणे:- नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी भीमा कोरेगाव येथील विजय स्मृतीस्तंभाला अभिवादन केले. सोबतच वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे, कवी कलश समाधी व गोविंद गोपाळ यांचे बनसोडे यांनी दर्शन घेतले. संभाजी महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी तीन दिवसांपूर्वी झाली. सोमवारी अण्णा बनसोडे यांनी शंभूंच्या समाधीचे दर्शन घेत वढू बुद्रुक ग्रामपंचायतीचे पांडुरंग गायकवाड यांच्या घरी भेट दिली.

यावेळी सरपंच तुळापूर गुंफा इंगळे, सरपंच वढू बुद्रूक माऊली भंडारे, कोरेगांव भीमाचे संरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच अंकुश शिवले, विजय गव्हाणे, माजी उपसरपंच रमाकांत शिवले, संतोष शिवले, सतीश लांडगे, नाना काटे, संजय अवसरमल, शशी घुले, निलेश पंढरकर, आशिष लांडगे, दातीर पाटील, लाला तांबे, तानाजी वडवे, कृष्णा अरगडे, ग्रामविकास अधिकारी बिबवे, रतन दवणे, सदानंद फडतरे, रविंद्र शिंदे व शंभू भक्त यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

viara ad
viara ad

यावेळी भीमा कोरेगाव ते पिंपळे जगताप रस्ता करण्याबाबत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह ग्रामस्थांनी उपाध्यक्ष बनसोडे यांना दिले. सोबतच, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीनेही संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी शासकीय सुट्टी देण्यासोबतच पुण्यतिथीच्या दिवशी हेलिकॉप्टरद्वारे शासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, उत्तम भंडारे, संजय भंडारे, अनिल भंडारे, सचिन भंडारे यांनी सांगितले.

मुंबईतील कामकाज आटोपून बनसोडे शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. शहरातील विविध भागातील त्यांच्या समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. तसेच शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. रविवारी गुढीपाडव्या दिनी ते आपल्या निवासस्थानी होते. सोमवारी दुपारी १२ वाजता बनसोडे यांनी तुळापूर वढू येथील संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यानंतर तेथीलच भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"