फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

सासूचे घर विकून पैसे न दिल्याने प्रेयसीला जबर मारहाण ; प्रियकरास अटक!

सासूचे घर विकून पैसे न दिल्याने प्रेयसीला जबर मारहाण ; प्रियकरास अटक!

पिंपरी : प्रेयसीच्या सासूचे घर विकून पैसे आणून न दिल्याने प्रियकराने एका महिलेला जबर मारहाण केली .आरोपीस काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवार 18 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अमरदीप कॉलनी, नंबर दोन ,ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडली.

viara vcc
viara vcc

एका महिलेने याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदेश लाजरस चोपडे (रा. अमरदीप कॉलनी, नंबर दोन, ज्योतिबा नगर काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी यांचे प्रेम संबंध होते. आरोपीने फिर्यादी महिलेच्या सासूचे घर विकून पैसे देण्याची मागणी केली . पैसे न दिल्याने फिर्यादीला शिवीगाळ करून संपूर्ण शरीरावर व तोंडावर लाथा बुक्क्यांनी व कमरेच्या पट्ट्याने पट्ट्याने मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात घरातील मोठ्या कुल्पाने ठिकठिकाणी वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला .याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"