फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

गिलबिले खून प्रकरण; फरार आरोपींना न्यायालयापुढे उपस्थित राहण्याचे आदेश!

गिलबिले खून प्रकरण; फरार आरोपींना न्यायालयापुढे उपस्थित राहण्याचे आदेश!

फरार आरोपी  किसन तापकीर व सोमनाथ पाटोळे
पिंपरी : आर्थिक देवाण-घेवाणीवरून नितीन शंकर गिलबिले यांचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खुनातील काही आरोपी पकडण्यात आले मात्र दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर पकड वॉरंट काढले आहे. न्यायालयाने या फरार आरोपींना 30 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत .

नितीन शंकर गिलबिले रा. वडमुखवाडी, चर्होली यांची 12 नोव्हेंबर 2025 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार किसन ज्ञानोबा तापकीर रा. वडमुखवाडी, चर्होली, व सोमनाथ प्रकाश पाटोळे रा. सोळू ,ता. खेड जि. पुणे यांचा सुद्धा यात सहभाग होता अशी कबुली दिल्याने त्यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र ते नोव्हेंबर पासून फरार आहेत. न्यायालयाने त्यांच्यावर हजर राहण्यासाठी पकड वॉरंट काढले आहे. 30 जानेवारी 2026 पर्यंत त्यांनी न्यायालयापुढे उपस्थित राहावे असे आदेशात म्हटले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस उप आयुक्त परीमंडल तीन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

viara vcc
viara vcc

 क्रेनच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू!
पिंपरी: भरधाव वेगातील हायड्रोलिक क्रेनने धडक दिल्यामुळे रस्ता ओलांडत असलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी 31 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नखाते चौक, रहाटणी येथे घडला. उमेश करीमन चौहान (वय 25, रा. शास्त्रीनगर, काळेवाडी, मूळ रा. जि. बक्सर, बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शुभम तानाजी खानेकर (वय 30, रा. जीवननगर, ताथवडे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची आजी रस्ता ओलांडत असताना क्रेनने जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"