फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
गुन्हेगारी

गॅस टाक्या व गॅस ट्रान्सफर करण्यास लागणारे साहित्य जप्त!

गॅस टाक्या व गॅस ट्रान्सफर करण्यास लागणारे साहित्य जप्त!

पिंपरी: बेकायदेशीररित्या गॅस टाक्या व गॅस ट्रान्सफर करण्यास लागणारे साहित्य असा एकूण 45 हजार तीनशे रुपये किमतीचा अवैध गॅस साठा व साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळवून लोकांच्या जीवितस हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास राधेश्याम कंपनीच्या शेजारी, गायकवाड वस्ती, कुरुळी येथे घडली.

viara vcc
viara vcc

किरण अर्जुन जाधव पोलीस हवालदार, खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी दक्षिण माळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गणेश संतोष कुंभार (वय 24, रा. सुदामाचे पोहे बिल्डिंग जवळ, जाधव यांचे येथे भाड्याने चाकण चौक, चाकण, ता. खेड ),उद्धव गोसावी (वय 36, रा. चाकण, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने आरोपी क्रमांक दोन यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे व अत्यावश्यक सेवेतील गॅस सिलेंडर खरेदी करून जीवनावश्यक वस्तू असलेल्या घरगुती वापराचा गॅस विनापरवाना मोठ्या सिलेंडर टाक्यातुन काढून छोट्या चार किलो वजनाच्या लोखंडी सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस रिफलींग सर्किटचे साह्याने धोकादायक रित्या कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता, लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असून सुद्धा मानवी जीविका हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अति शिग्र ज्वालाग्रही पदार्थ असल्याचे माहिती असूनही ट्रान्सफर करून गॅसच्या टाक्या चढे दरात विक्री केल्या. विनापरवाना अवैधरित्या गॅस टाकी व गॅस ट्रान्सफर करण्यास लागणारे साहित्य असा एकूण 45 हजार 300 रुपये किमतीचा अवैध गॅस साठा व साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"