फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
गुन्हेगारी

गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड!

गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड!

पुणे : शहरातील गज्या मारणे गँगकडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिसांनी चांगलच फैलावर घेतल होतं. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरुड परिसरातून धिंड काढली. पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेले आरोपी हे कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्य असून या गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने व आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढली. हाताला बेड्या आणि तोंडाला काळ कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवल.

पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. तर अद्याप एक जण फरार आहेपुणे पोलिसांना जोरदार खडसावल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर, पोलीस कठोर कारवाई करत असल्याचे दिसून येते.

केंद्रीयमंत्र्यांनी पुणे पोलिसांना खडसावलं
पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, पुणे पोलीस डोळे बंद करुन बसलेत का? अशा भाषेत मोहोळ यांनी समाचार घेतला होता. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तीन आरोपींची पुणे शहरातील कोथरूड परिसरातून धिंड काढल्याने टोळी गँगमध्ये पोलिसांची चांगलीच जरब बसली आहे. ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर भागात एका मिरवणूकीदरम्यान कुख्यात गुंड गजा माने यांच्या टोळीतील काही जणांनी आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती.

मोकोका अंतर्गत कारवाई
गज्या मारणे टोळीला मकोका लावला असून टोळी प्रमुखावरही कारवाई करणार आहे. टोळीला नेस्तानाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नका, त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर केली जाणार आहे, तर त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवण्यात आल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले. दरम्यान, गजानन मारणे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलीस मोका कायद्याअंतर्गत कारवाई करणार ‌असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. याआधी अनेकदा गजानन मारणेवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, ती तोंडदेखली कारवाई ठरली आणि त्याच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच राहिल्याचे पाहायला मिळाले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"