दारू विकत आणण्याच्या वादातून मित्रावर चाकूहल्ला!

पिंपरी : दारू विकत आणण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एकाने आपल्या मित्रावर चाकूने हल्ला केला. ही घटना बुधवारी (२० ऑगस्ट) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोशी येथील मॉडर्न वाईन्स या दुकानासमोर घडली.

तुकाराम संदीप साळवे (वय ३३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संदीप बाबुराव साळवे (वय ६२, बोराटेवस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गणेश चंद्रकांत बोराटे (वय ४०, बोराटेवस्ती, मोशी), सचिन कदम (वय ३०, संजयगांधी नगर मोशी), रमेश धनगावे (वय ३१, संजयगांधी नगर मोशी) आणि नवनाथ लांडगे (वय ४०, संजयगांधी नगर मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गणेश बोराटे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा तुकाराम साळवे आणि त्याचे मित्र आरोपी गप्पा मारत बसले होते. दारू विकत आणण्याच्या कारणावरून आरोपी आणि तुकाराम यांच्यात भांडण झाले. यावेळी आरोपीने तुकारामला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आरोपींनी चाकूने तुकाराम याच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.