वाढदिवसाच्या पार्टीत मित्रावर चाकूने वार!

पिंपरी : वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या मित्रांनी एका मित्रावर चाकूने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) रात्री कॅस्ट्रेलिया सोसायटीसमोर पिंपळे सौदागर येथे घडली

सुशील ढवळे (४०, पिंपळे सौदागर) असे जखमी व्यक्तीने नाव आहे. सुशील यांच्या पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रितम चंद्रकांत कारंडे (५४, पिंपळे गुरव), सोमेश्वर संभाजी कांबळे (३३, आळंदी), नंदु सुदाम गायकवाड (४८, महाळुंगे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील आणि आरोपी हे मित्र आहेत. ते सोमेश्वर याच्या वाढदिवसासाठी सोमवारी रात्री पिंपळे सौदागर येथे जमले होते. वाढदिवस साजरा करण्याच्या करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी सुशील ढवळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच चाकूने त्यांच्या छातीवर, डाव्या दंडावर आणि डाव्या पायावर वार करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
भावाच्या पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी नणंदेवर गुन्हा!
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून नणंदेने भावाच्या पत्नीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. यात विवाहिता जखमी झाली. ही घटना रविवारी (२८ सप्टेंबर) संध्याकाळी पिंपरी चिंचवड लिंक रोड, चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी मारहाण झालेल्या विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीची नणंद भिवरा राजू सूर्यवंशी (३७, चिंचवड) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची नणंद आरोपी हिने फिर्यादी सोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. हाताने मारहाण केल्यामुळे फिर्यादीच्या डाव्या हाताचे बोट फॅक्चर झाले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

