देशाला डझनभर करांच्या जाळ्यातून केले मुक्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकसित भारताचे लक्ष गाठण्यासाठी आत्मनिर्भर मार्गावरून चालावे लागेल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आणि स्वदेशी या दोन गोष्टींवर जनतेला मार्गदर्शन केले .वन नेशन वन टॅक्स च स्वप्न जीएसटी मुळे साकार झाले झाले. गरीब आणि नवमध्यम वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व राज्यांना सोबत घेत स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा केल्याचे मोदी यांनी सांगितले .यामुळे देश डझनभरकरांच्या जाळ्यातून मुक्त झाला आहे, ही सुधारणा ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

नवरात्रीच्या 22 सप्टेंबर पहिल्या दिवसापासून नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू होतील . हा एक बचत उत्सव असून या उत्सवात नागरिकांची बचत वाढेल .तुमच्या पसंतीच्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करू शकाल . आपल्या देशाचे गरीब , मध्यमवर्ग , तरुण , शेतकरी , महिला ,दुकानदार ,व्यापारी, उद्योजक या सर्वांना बचत उत्सवाचा फायदा होणार आहे .सणासुदीचे दिवस असून नागरिकांचे तोंड यामुळे गोड होणार आहे असे मोदी यांनी सांगितले . देशातील करोडो लोकांना बचत उत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या . कित्येक दशके आपल्या देशातील जनता ,व्यापारी वेगवेगळ्या कराच्या जाळ्यात अडकलेले होते. जकात, विक्रीकर , उत्पन्न शुल्क , सेवाशुल्क असे एक डझनभर कर आपल्या देशात होते . यामुळे अनेक समस्यांना व्यापारी आणि उद्योजकांना त्रास सहन करावा लागत होता . मात्र जीएसटी मुळे हा त्रास कमी झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे देश डझनभर करांच्या जाळ्यातून मुक्त झाला. वन नेशन वन टॅक्स चे स्वप्न पूर्ण झाले आहे . रिफॉर्म सातत्याने चालणारी प्रक्रिया असते . तेव्हा नेक्स्ट जनरेशन बदल तितकेच महत्त्वाचे असतात, देशाची सध्याची गरज आणि भविष्याची गरज पाहता जीएसटीचे नवे रिफॉर्म्स लागू होत आहेत . आता फक्त पाच टक्के आणि 18% टॅक्स स्लॅब राहतील . दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दर यामुळे आता कमी होणार आहेत असा दावा त्यांनी केला . जीएसटी कमी झाल्याने देशातील नागरिकांना आपले स्वप्न पूर्ण करणे सोपे होणार आहे . घर बांधणे, टीव्ही खरेदी करणे , टू व्हीलर खरेदीसाठी कमी खर्च करावा लागेल .पर्यटन स्वस्त होईल .
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचे लक्ष गाठण्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या मार्गावरून चालावे लागेल असे सांगितले. भारताला आत्मनिर्भर बनवण्याची मोठी जबाबदारी लघु .मध्यम आणि सूक्ष्म उद्योगावर आहे .देशातील लोकांच्या हिताचे आहे ते देशात बनवले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. आता भविष्यात आपण ज्या वस्तू खरेदी करू त्या मेड इन इंडिया असेल .आपल्याला प्रत्येक स्वदेशीचा प्रतिक करायचा आहे .केंद्र आणि राज्य एकत्र पुढे जातील तेव्हा भारताचे राज्य विकसित होईल आणि भारत विकसित होईल असे सांगून त्यांनी नवरात्रीच्या आणि जीएसटी बचत उत्सवाच्या शुभेच्छा जनतेला दिल्या.

