रो हाऊससाठी गुंतविलेले 65 लाख रुपये परत न करता केली फसवणूक!

पिंपरी : रो हाऊस घेण्यासाठी एका व्यक्तीने नोटरी करारनामा व फेर प्लॅन मंजुरी घेऊन समजूतीचा करारनामा (एम ओ यु) केला होता. त्या बदल्यात फिर्यादी यांनी आरोपीच्या खात्यावर 65 लाख रुपये आरटीजीएस मार्फत दिले परंतु आरोपीने रो हाऊस आणि पैसे परत न करता फसवणूक केली. ही घटना 17 सप्टेंबर 2024 ते 15 मार्च 2026 या कालावधीत शिवशंभू कॉलनी, किवळे येथे घडली.

या प्रकरणी कल्पेश वसंत चौधरी (वय 33, फ्लॅट नंबर 102, शुभारंभ रेसिडेन्सी, भीमाशंकर रोड, किवळे )यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वासुदेव गंगाधर गाडेकर (वय 55, फ्लॅट नंबर सी एक 403, निसर्ग निर्मिती कोकणे चौक, पिंपळे सौदागर, सुशांत वासुदेव गाडेकर वय 26 राहणार वरील प्रमाणे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याला फिर्यादीस रो हाऊस हवा असल्याचे माहित असल्याने त्यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी नोटरी करारनामा व फेर प्लॅन मंजुरी दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी समजूतीचा करारनामा (एम ओ यु) केला. त्या बदल्यात ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांनी आरोपीच्या खात्यावर 65 लाख रुपये आरटीजीएस केले होते. परंतु आरोपी यांनी सदरचे पैसे स्वीकारून फिर्यादीला कोणत्याही प्रकारे रो हाऊस अद्याप पर्यंत दिले नाही. पैसेही परत केले नाहीत. फिर्यादी आरोपींना रो हाऊस बद्दल पैशाबद्दल मागणी करीत असता आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करत आहेत.

