फक्त मुद्द्याचं!

20th March 2026
गुन्हेगारी

फ्लॅट विक्रीचे पैसे कंपनीच्या नावावर न भरता केली फसवणूक!

फ्लॅट विक्रीचे पैसे कंपनीच्या नावावर न भरता केली फसवणूक!

पिंपरी : सत्यम डेव्हलपरच्या फ्लॅट विक्रीचे पैसे कंपनीच्या नावावर न भरता परस्पर स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर भरून दोघा व्यक्तींनी बांधकाम व्यवसायिकाची सुमारे 52 लाख 43 हजार पाचशे रुपयांची फसवणू क केली आहे. ही घटना 25 जानेवारी 2025 ते 23 मे 2025 या काळात सत्यम डेव्हलपर्सचे ऑफिस, ॲक्सिस बँक एटीएमच्यावर ,काळेवाडी फाटा, रहाटणी येथे घडली.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

या प्रकरणी एका व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उमेश संभाजी कर्णे (वय 38, सनशाइननगर ,नखाते वस्ती, रहाटणी), संतोष उर्फ संदीप बाबुराव पाटील (वय 43, वर्धमान हाइट्स, छत्रपती चौक, रहाटणी )अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे सत्यम डेव्हलपर्सच्या ऑफिसमध्ये पूर्वीपासून कामाला होते. भागीदारी संपल्यानंतर विश्वासाने पुन्हा त्यांना कामावर ठेवण्यात आले. परंतु 25 जानेवारी 2025 ते 23 मे 2025 या कालावधीत फ्लॅट विक्री व्यवहारांमध्ये आरोपी यांनी आपसात संगणमत करून फ्लॅट खरेदी दारांकडून सत्यम डेव्हलपर च्या नावाने सह्या करून पावत्या देण्यात आल्या. फ्लॅट विक्रीचे पैसे सत्यम डेव्हलपरच्या बँक खात्यावर न घेता त्यांनी ते पैसे त्यांचे स्वतःच्या बँक खात्यावर आणि त्यांचे नातेवकांच्या बँक खात्यावर तसेच रोख स्वरूपात 52 लाख 43 हजार पाचशे रुपयाची रक्कम घेऊन विश्वासघात करून फसवणूक केली. काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"