ॲडमिशन करून देतो असे सांगून सात लाख दहा हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : एन. वाय. तासगावकर कॉलेजचा व्यक्ती असल्याचे भासवून कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन करून देतो असे सांगून सात लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एक सप्टेंबर 2025 ते आज पर्यंत विद्यानगर, चिंचवड येथे घडला.

याबाबत डॉक्टर विजय मारुती माने (वय 53, ऐश्वर्या सोसायटी, फ्लॅट नंबर सहा, प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक मौर्य (वय 35 ,लाईफ रिपब्लिक सोसायटी, हिंजवडी, मूळ -रा. कंध्रारापूर ता.जि. अजमगड, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने एन. वाय. तासगावकर कॉलेजचा इसम असल्याचे भासवून एन. वाय. तासगावकर या कॉलेजचे खोटे बनावट वेब पेज बनवून एन .वाय. तासगावकर कॉलेज येथे एमबीबीएस करिता मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन करून देतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या मुलीचे ॲडमिशन न करता ऑनलाइन व रोख स्वरूपात दिलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. शिवाय बघून घेतो अशी धमकी दिली. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग हे तपास करत आहेत.
मेफेड्राॅन (एम.डी) अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक!
पिंपरी : दोन व्यक्तींनी मेफेड्राॅन (एम.डी) अमली पदार्थ बेकायदेशीररित्या संगणमत करून विक्रीकरिता जवळ बाळगल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .ही घटना एक मार्च रोजी दुपारी चार वाजता एम. एस. सी. बी. तळे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे घडली.
याप्रकरणी लक्ष्मण सहादू मुठे पोलीस शिपाई, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इलाही अकबर शेख (वय 37, रा. पवार नगर, थेरगाव), रफिक करीम मुजावर (वय 40, रा वाल्हेकर वाडी, श्रीपती कॉलनी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी बेकायदेशीर रित्या सात लाख 12 हजार रुपये किमतीचा 11 ग्रॅम 21 मिलिग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी) अमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगले होते. पोलिसांच्या तपासणीत त्यांनी ते ताब्यात घेतले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे कांबळे पुढील तपास करत आहे.

