फक्त मुद्द्याचं!

10th April 2026
गुन्हेगारी

सेबी रजिस्टर कंपनी असल्याचे भासवून 75 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक!

सेबी रजिस्टर कंपनी असल्याचे भासवून 75 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणून निर्मल बंग सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड व सेबी असे लिहिलेल्या त्यांच्या नावाचा शिक्का व रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या बनावट लेटर वरून एका व्यक्तीची 75 लाख 50 हजार रुपयाची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. ही घटना पाच नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2025 या कालावधीत सी. 1201, अझुरे डीकॅथलॉन रोड ,कॉसमॉस बँकेच्या वरती भुमकर चौक, ताथवडे ,पुणे येथे घडली .

viara vcc
viara vcc

याबाबत एका व्यक्तीने सायबर शाखेकडे गुन्हा नोंदवला आहे .मोबाईल धारक, दिव्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), प्रोफेसर सुनील जैन मोबाईल धारक, एन बी प्रॉफिट किंग्स 907 व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन मोबाईल धारक, एन बी डिपॉझिट सर्विस, जीजी 16 19 व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन व इतर सदस्य, वेबडब्ल्यूएचआर एम यु सी जे फोर झेड डब्ल्यू वाय एन लिंक धारक, निर्मल बँक सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे बनावटी करणारे , सर्व बँक अकाउंट धारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी माहितीनुसार निर्मल बंग सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (ऑफिस पत्ता- मॅरेथॉन इननोवा कार्पोरेट सेंटर, बी टू 301, 302 पेनीनशुला कॉर्पोरेट पार्क, लोवर परेल, वेस्ट लोअर परेल, मुंबई) या सेबी रजिस्टर कंपनीचा सल्लागार बोलत असल्याचे भासवून शेअर मार्केट गुंतवणूक करिता ग्रुप जॉईन करण्यासाठी मेसेज करून लिंक पाठवली. एन बी प्रॉफिट किंग्स 907 या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून सदर ग्रुप मध्ये आरोपी क्रमांक दोन व तीन यांनी विविध शेअर आयपीओ गुंतवणुकीचा सल्ला देऊन गुंतवणूक करण्याकरिता भाग पाडले. एन बी डिपॉझिट सर्विस जीजी 1619 या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन करून घेऊन सदर ग्रुप मधील इतर सदस्य यांनी निर्मल बंग व सेबी असे लिहिलेल्या त्यांच्या नावाचे शिक्क्यावर रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या बनावट लेटर वरून विविध बँकांचे डिटेल्स पाठवून त्यावरती पैसे पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने 75 लाख 50 हजार रुपये ऑनलाईन पाठवले मात्र हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांची फसवणूक झाली. सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नाळे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"