फक्त मुद्द्याचं!

2nd March 2026
गुन्हेगारी

बनावट धनादेश देऊन पावणेसात लाखाची फसवणूक!

बनावट धनादेश देऊन पावणेसात लाखाची फसवणूक!

पिंपरी : वाढदिवसानिमित्त सहा लाख 79 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन एका व्यक्तीने आयडीएफसी बँकेचा बंद असलेल्या खात्याचा धनादेश देऊन फसवणूक केली. ही घटना एक फेब्रुवारी रोजी न्यू गणेश ज्वेलर्स बोर्हाडेवाडी मोशी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत गुलाबसिंग मेन सिंग चौहान (वय 24, रा. सेक्टर नंबर एक, फ्लॅट नंबर 49 ,बी विंग इंद्रायणी गार्डन अपार्टमेंट, इंद्रायणीनगर ,भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सतीश ज्ञानदेव वालशिंगे (वय अंदाजे 45, रा. सर्वे नंबर 98/1/2 ,जय गणेश साम्राज्य चौक, पांजरपोळ, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सतीश वालशिंगे यांनी वाढदिवस असल्याचे सांगून न्यू गणेश ज्वेलर्स बोऱ्हाडे वाडी येथून फिर्यादीच्या दुकानांमध्ये सहा लाख 79 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, लॉकेट व कडा असे दागिने खरेदी करून दागिनेच्या रकमेचा धनादेश दिला. आरोपीने दिलेला आयडीएफसी बँकेचा धनादेश बँक खाते बंद असल्याने वटवला गेला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादीची सहा लाख 79 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पानसरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"