फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकीचे आमीष दाखवून 68 लाख 85हजार रुपयांची फसवणूक!

शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकीचे आमीष दाखवून 68 लाख 85हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी: शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून खात्रीशीर फायदा देण्याचे आमीष दाखवून व विश्वास संपादन करून एलिस ब्लू या ॲपच्या माध्यमातून एका व्यक्तीस 68 लाख 85हजार 257 एवढ्या रकमेची फसवणूक केली आहे .ही घटना दोन मार्च ते 16 एप्रिल 2025 पर्यंत फिर्यादी यांचे राहते घरात ऑनलाइन माध्यमातून करण्यात आली. याप्रकरणी सोमेश भारद्वाज (वय 49 ,सध्या रा. डी -304, ऑस्टेरिया रॉयल , रावेत ,मुकाई चौक जवळ) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

अंकित सिंग, कम्युनिटी एडमिन विजय प्रकाश ,काजल गिरासे, एल नागार्जुन ,ॲलिश ब्लू या व्हाट्सअप धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर ट्रेडिंग मधून खात्रीशीर प्रॉफिट देण्याचे आमीष दाखवून या ॲपधारक व पैसे पाठविलेल्या वेगवेगळ्या बँकांचे अकाउंट धारकांच्या खात्यावर एकूण 68 लाख 85 हजार 257 रुपये एवढी गुंतवणूक फिर्यादीला करण्यास भाग पाडले.

फिर्यादीने गुंतवलेल्या रकमेवर दोन कोटी रुपये एवढा मुद्दल व नफा असल्याचे आमीष दाखवून गुंतवणूक रक्कम व नफा काढण्यासाठी एकूण जमा रकमेच्या 0.5 टक्के चार्जेसची मागणी करून आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची गुंतवणूक केलेली रक्कम व नफा परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फटांगरे हे याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"