फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

आकर्षक परताव्याचे आमीष दाखवून 59 लाख रुपयाची फसवणूक!

आकर्षक परताव्याचे आमीष दाखवून 59 लाख रुपयाची फसवणूक!

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल असे आमीष दाखवून फिर्यादी व त्याचा मित्र यांची 59 लाख 25 हजार रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवार 13 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे .ही घटना दोन जानेवारी 2025 पासून ते 22 सप्टेंबर पर्यंत रा फ्लॅट नंबर ए ८०१ ब्ल्यू अर्थ दत्त मंदिर जवळ वाकड येथे राहत्या घरी घडली

viara vcc
viara vcc

अक्षय दीपक पंजाबी (वय 30, रा. फ्लॅट नंबर 801, ब्ल्यू आर्ट दत्त मंदिर जवळ ,वाकड )यांनी फिर्याद दाखल केली आहे. संकेत बच्चूभाई मिस्त्री (वय 39, रा. सी. 202 ,हर्ष निकेतन, एस एम रोड, घरतनपाडा, नंबर दोन, वेस्टन एक्सप्रेस हायवे जवळ दहिसर, मुंबई )आणि रुपेश नारायण बारिया (वय 41, रा. जय भवानी माता रोड, माकडवाला कंपाऊंड, अंधेरी वेस्ट मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळणार असल्याचे सांगून फिर्यादी व त्याचा मित्र देवानंद तहकंदास अजवानी यास एंजील वन कंपनीचे एकूण पाच हजार एन. एस. सी चे शेअरवर गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याचे आमिष दाखवले. एंजील वन कंपनीचे बनावट शेअर सर्टिफिकेट व्हाट्सअप वर पाठवून फिर्यादी व त्यांचे मित्राची एकूण 59 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"