बँकेचे क्रेडिट कार्ड नंबर घेऊन 52 हजार रुपयांची फसवणुक!

पिंपरी: इंडसइंड बँकेतून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीची 52 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी फ्लॅट नंबर 32, ए- विंचडीम सोसायटी, आकार फाउंड्री शेजारी तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सुजित बाबाराव वानखेडे (वय 41, प्लॉट नंबर 32-ए विंचडीम सोसायटी, आकार फाउंड्री शेजारी तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात फिर्याद दिली आहे.
इंडसइंड बँकेतून बोलत आहे असे सांगून एका महिला आरोपीने फिर्यादी यांना तुमचे कडील दोन क्रेडिट कार्ड पैकी एक क्रेडिट कार्ड बंद करते असे सांगून व विश्वास संपादन करून इंडसइंड बँकेचे क्रेडिट कार्ड नंबर फिर्यादी कडून घेतला. व या कार्डमधून 52 हजार पाचशे रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांबळे पुढील तपास करत आहेत.

जुगार खेळणार्या सात व्यक्तीं ताब्यात!
चाकण : बेकायदेशीररित्या तीन पानाचा पत्त्याचा जुगार खेळताना सात व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. ही घटना बुधवार सात जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास चाकण खंडोबा माळ, चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या शेजारी, पत्रा शेडमध्ये घडली. याप्रकरणी शरद जगन्नाथ खैरनार पोलीस शिपाई, चाकण उत्तर पोलीस स्टेशन यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मारुती महादेव कांडगे (वय 62, मार्केट यार्ड चाकण), राजाराम देवराम आगरकर (वय साठ रा. आगरकरवाडी, चाकण), अशोक निवृत्ती सोरटे (वय 58, रा मार्केट यार्ड चाकण), चंद्रकांत धोंडीबा जाधव (वय 57, रा पठारवाडी, चाकण), प्रमोद बलमदेव सहाणे (वय 58, रा मार्केट यार्ड ,चाकण), प्रकाश नारायण कांडगे (वय 63, मार्केट यार्ड ,चाकण), संजय ज्ञानेश्वर बिरदवडे (वय 61, रा. मार्केट यार्ड, चाकण, ता. खेड, जि. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील आरोपी हे एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी पत्त्याचा जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून नऊ हजार तीनशे पस्तीस रुपये रोख जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस हवालदार ढवळे हे तपास करत आहेत.

