ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 51 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 51 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर 2025 ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत फ्लॅट नंबर 302, बी विंग ज्ञानगंगा सोसायटी, रॉयल रहाडगी फेज एक समोर, शिवराज नगर, रहाटणी येथे घडली.
याबाबत एका व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवीषा सन्याम व तिचे अनोळखी साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या अनोळखी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवीशा सन्याम हिने (circle of insigh) व्हाट्सअप ग्रुप वर ऍड करून (stocks.cora-pro.com) ट्रेडिंग साईटची माहिती देऊन त्यावर खाते ओपन करण्यास सांगून गुंतवणूक केल्यास जास्त परताव्याचे आमीष दाखवून वेगवेगळ्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीचे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठवण्यास भाग पाडून फिर्यादी यांची एकूण 51 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केली. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे धुमाळ हे तपास करत आहेत

दारू पिऊन टेम्पो चालकाची दुचाकीस्वराला धडक;एकाचा मृत्यू !
पिंपरी : दारू पिऊन टाटा कंपनीचा 909 बी एस तीन या टेम्पोची दुचाकीस्वराला जोरदार धडक दिली. या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 15 मार्च रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास माताळवाडी फाटा, भुगाव, ता. मुळशी येथे घडली. केशव लांडगे (वय 41) असे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत वृषाली केशव लांडगे (वय 37, रा. सागर कॉलनी कोथरूड, पुणे, मुळगाव- भिजवणार, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रवी रमेश घुले (वय 26, रा. पिरंगुट, पुणे, मूळ- रा. लोणार, बुलढाणा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती केशव लांडगे (वय 41) व त्यांचा मुलगा ऋषिकेश हे भुकूम येथील घरी येत असताना त्यांचे मोटरसायकल नंबर (एम एच 12/ एचपी /23 94) हीच पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या 909 बीएस तीन क्रमांक (एम एच 14/ सीपी/ 4203) वरील आरोपी याने दारूच्या अंमलाखाली वाहन चालवून दुचाकी स्वराला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत मयत केशव लांडगे हे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले. व फिर्यादी यांचे गाडीचे नुकसान केले. बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ठाकरे हे पुढील तपास करत आहेत.

