फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
गुन्हेगारी

बस विकत देण्याच्या बहाण्याने 51 लाख 45 हजार रुपयांची फसवणुक!

बस विकत देण्याच्या बहाण्याने 51 लाख 45 हजार रुपयांची फसवणुक!

पिंपरी : चार बस विकत देतो असे सांगून एका व्यक्तीकडून 51 लाख 45 हजार रुपये आरटीजीएस, ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात घेऊन बस ताब्यात दिल्या नाहीत. तसेच घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली. ही घटना 14 मार्च 2023 ते 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत वेळोवेळी सेक्टर नंबर 16, राजे शिवाजी नगर, चिखली येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत रवींद्र विठ्ठल तानवडे (वय 50, रा.टेलिफोनएक्सेंज जवळ, 5 सम्राट रेजन्सी, वडगाव शेरी, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .संजय नारायण पवार, सागर संजय पवार, सुवर्ण संजय पवार (सर्व रा. सेक्टर नंबर 16, राजे शिवाजी नगर, चिखली ,ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपींनी फिर्यादीस टी एस /08/यु एच 49 40, टी एस 13 /युसी /40 99, एच 14/ जीडी /8008, एम एच 14 /जीडी /8 800 या बस फिर्यादीस विकत देतो असे सांगून आरोपींच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत असे सांगितले. सदर गाड्यांचे आरटीओचे खोटे शिक्के मारलेले व बनावट कागदपत्रे फिर्यादीस दाखवून त्या बदल्यात फिर्यादी व त्यांची पत्नी यांचेकडून 51 लाख 45 हजार रुपये आरटीजीएस ,ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात (वचन चिठ्ठीद्वारे लिहून) घेऊन या बसेस फिर्यादीस विकत दिल्या नाहीत. तसेच फिर्यादीचे घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माटे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"