शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ४१ लाखांची फसवणूक!

पिंपरी : एका अज्ञात व्यक्तीने शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची ४१ लाखांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २५ एप्रिल ते २६ जून दरम्यान बाणेर येथील फ्रेसिआय अपार्टमेंटमध्ये घडली. राजेशकुमार दास (४५, बाणेर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना ‘रीतिका’ नावाच्या एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲपवर शेअर ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यासाठी एक लिंक पाठवली. फिर्यादीने लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर ‘रीतिका’ आणि ‘रघू तिवारी’ यांनी मिळून ‘ट्रेडिंग ५४५५’ नावाचा एक टेलिग्राम ग्रुप तयार केला आणि फिर्यादीला यूएसडीटीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादीकडून एकूण ४१ लाख १९ हजार ४१४ रुपये जमा करण्यास लावले, पण कोणताही परतावा दिला नाही. बावधन पोलीस तपास करत आहेत. [3:40 PM, 9/19/2025] Raju Gaykawad: हॉटेल चालवण्यासाठी मागितली खंडणी, एकास अटक
१० हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला अटक
चाकण : हॉटेल चालविण्यासाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (१७ सप्टेंबर) रात्री खेड तालुक्यातील वराळे गावातील हॉटेल श्रेयस येथे घडली.
नागेश गोपीनाथ शिंदे (३९, रोहकल, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश बाबाजी डुंबरे (३१, ओतूर, जुन्नर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डुंबरे यांचे वराळे येथे हॉटेल आहे. आरोपी नागेश बुधवारी रात्री डुंबरे यांच्या हॉटेलमध्ये आला. त्याने डुंबरे यांना धमकी देत इथे हॉटेल चालवायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा, लागेल. अशी मागणी केली. तसेच हॉटेल मध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. डुंबरे आणि हॉटेल मधील कामगाराला मारहाण करून धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

